Marathi

 

कृतज्ञ   व  कृतघ्न

जेथे  कृतज्ञता असावी
तेथेच  कृतघ्नता दिसावी ……
मनुष्याच्या ह्या वर्तनाचे मला सदैव कुतुहूल वाटत आलेलं आहे.
सुख: दु:खात साथ  देणारी , मैफिलीमध्ये रंगत  भरणारी अशी बाटली …….

मैफिल संपतच तिला तोडून फोडून किंवा कचरा कुंडीची वाट दाखवणारी, माणसांची ही कृतघ्न  जमात  सदैव माझ्या चिंतेचा विषय राहिलेला आहे…। आणि ह्या चिंतेतूनच
माझ्या चिंतनाचा जन्म झाला……  व मला, त्या वापरून टाकून दिलेल्या  तुटक्या फुटक्या वस्तूत सौंदर्य दिसू  लागले….
जगन्नियंत्याने  बहाल केलेल्या ह्या सौंदर्य दृष्टीसाठी मी सदैव त्याचा  ऋणी व कृतघ्न राहीन.
मैफिल रंगविणारी बाटली असो. वा हजारो मैलांच्या प्रवासात साथ देत देत झिजणारे टायर असो, किंवा तहानेने जीव व्याकूळ झालेला असतांना तहान क्षमविणारी पाण्याची बाटली असो ….
या सर्वांचा मी कृतघ्न  आहे, राहीन.
त्यांच्यात दडलेले सौंदर्य  पाहीन व इतरांना त्या सौंदर्याची अनुभूती देईन